शहादेव पिंपळे यांना मैत्रा फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सन्मानित
click2ashti update-आष्टी तालुक्याती जि.प.प्रा.शा.गणगेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शहादेव आजिनाथ पिंपळे यांना मैत्रा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.जेष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शशिकांत कुलथे,कवयित्री स्नेहलता पाठक,खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक गौतम खटोड,मैत्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द.ल.वारे या मान्यवरांच्या उपस्थितीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन सभागृह बीड येथे पुरस्कार वितरित करण्यात आला.
मैत्रा फाउंडेशन बीड यांच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा,सांस्कृतिक,सेवा,साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील 40 शिक्षकांना गौरविण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शहादेव पिंपळे यांना राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.शहादेव पिंपळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्पर्धा परीक्षा,हस्ताक्षर सुधार प्रकल्प,वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक सहल,विद्यार्थी दिंडी सोहळा,समाजाच्या सहभागातून वर्ग डिजीटल,बोलक्या भिंती,परसबाग,आदि उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले.तसेच स्वतः 16 वेळा रक्तदान केले आहे.कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या कार्याची दखल घेऊन मैत्रा फाऊंडेशनने त्या़ंना राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शहादेव पिंपळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.