दुख;द निधन-कडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच पारूबाई सांगळे यांचे निधन
आज सकाळी ९ वा.होणार अंत्यंसंस्कार
click2ashti update-आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच,हाॅटेल अमर पॅलेस चे मालक संपत सांगळे यांच्या मातोश्री पारूबाई सांगळे यांचे सोमवारी पहाटे १२.३० वा.दुख;द निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय(७६) होते.त्यांच्यावर कडा येथील अमर पॅलेस जवळ असलेल्या शेतात आज सोमवार दि.२५ रोजी सकाळी ९.३० वा.अंत्यंसंस्कार करण्यात येणार अहेत.
आष्टी तालुक्यातील महत्वाची समजलेल्या जाणा-या कडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच पारूबाई दिनकरराव सांगळे यांचे सोमवारी १२.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.२५/३/२०२४ रोजी सकाळी ९.३० वा. हॉटेल अमर पॅलेसजवळील शेतात होईल.अशी माहिती संपतराव दिनकरराव सांगळे,
शंकर दिनकरराव सांगळे यांनी दिली आहे.पारूबाई सांगळे यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,सुन,जावाई,नातवंडे,नातजावाई असा परिवार आहे.