व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

निष्क्रिय तहसिलदार हाय हाय..च्या उपोषण कर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसिल कार्यालय दणाणून सोडले

कडा शहरातील असलेला डाॅ.बाबासाहेबांचा पुतळा रस्त्यांच्या मध्यभागी बसवा या मागणीसाठी उपोषण

0

click2ashti update-सध्या साबलखेड ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर सरू असून,कडा शहरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा मुख्य रस्त्याच्या मध्यभागी बसविण्यात यावा या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे उपोषण आष्टी तहसिल समोर सुरु करताच, आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेता येथून पळ काढल्याने उपोषणकर्त्यांनी निष्क्रिय तहसिलदार हाय हाय..च्या घोषणाबाजी करत तहसिल कार्यालय दणाणून सोडले.

याबाबत अधिक माहिती अशी गेल्या वर्षभरापासून साबलखेड-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सध्या हे काम कडा शहरात सुरू असून,येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहे.या महामार्गावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील असलेला डाॅ.आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी बसावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे यशवंत खंडागळे यांनी आष्टी तहसील कार्यालयात आमरण आज शुक्रवार दि.२ रोजी सकाळी ११ वा.उपोषण सुरू केले आहे.उपोषण सुरू करताच आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेताच येथून पळ काढला.त्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी तहसीलदार विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधातही घोषणाबाजी केली.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही.तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार यशवंत खंडा वेळी यावेळी दिला.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.