अंगणवाडीचे चांगले अहवाल पाठविले म्हणून मागितली लाच;एसीबीची आष्टीत कारवाई
click2ashti update-शासनाच्या १० जानेवारी २०२४ च्या जीआर प्रमाणे वर्धित होउन मोठी अंगणवाडी झाली आहे.त्यासाठी आम्ही आपले अंगणवाडी चे चांगले अहवाल पाठविल्याने तुमची पगार ६००० रुपये वरुन १०००० रुपये झाली आहे.त्यामुळे आम्हाला बक्षीस म्हणून ५००० रुपये द्या म्हणून ५००० रुपये लाच मागणी अमृता श्रीकांत हाट्टे व नीता मालदोडे यांनी केली.व पाच हजार रुपये लाच रक्कम स्विकारत असतांनाच या दोघींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड यांनी रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी,आष्टी येथील एकात्मीक बाल विकास सेवा योजना कार्यालतील पर्यवेक्षीका अमृता श्रीकांत हाट्टे,(वय ३६ वर्ष) व कनिष्ठ सहायक नीता रामदास मलदोडे (वय २९ वर्ष) यांनी सदरची अंगणवाडी ही मिनी अंगणवाडी होती.ती महाराष्ट्र शासनाच्या १० जानेवारी २०२४ च्या जीआर प्रमाणे वर्धित होउन मोठी अंगमवाडी झाली आहे.त्यासाठी आम्ही आपले अंगणवाडी चे चांगले अहवाल पाठविलेले आहेत.त्यामुळे तुमची पगार ६००० रुपये वरुन १०००० रुपये झाली आहे. आम्हाला बक्षीस म्हणून ५००० रुपये लोकसेवक हाट्टे व मलदोडे हे ५०००/- रुपये लाचेची मागणी करत आहेत. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दिली. त्यावरुन दिनांक ३०/०७/२०२४ रोजी लाचमागणी पडताळणी केली असता यातील तक्रारदार यांना आलोसे मांनी मिनी अंगणवाडी असतांना चांगले अहवाल पाठविलेले आहेत.त्यामुळे शासनाचे जीआर प्रमाणे तकारदार यांची पगार ६००० रुपये वरुन १०००० रुपये झाली आहे आम्हाला बक्षीस म्हणून ५००० रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करुन ती स्वतः स्विकारण्याचे मान्य केले.त्यानुसार दिनांक ०२/०८/२०२४ रोजी सापळा लावला असतां एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय,पंचायत समीती,आष्टी येथे आलोसे श्रीमती.हाट्टे व मलदोडे यांनी पंचासमक्ष ५०००/ (पाच हजार रुपये) लाच रक्कम स्विकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे आष्टी जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,लाप्रवि छत्रपती संभाजी नगर मुकुंद अधाव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रति छत्रपती संभाजी नगर, श्री शंकर शिंदे, पोलीस उप-अधीक्षक,बीड यांचे मार्गदर्शनाखाली. श्री. गुलाब बाचेवाड,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.बीड व पोलीस अंमलदार श्रीराम गिराम,सुदर्शन निकाळजे,अमोल सरसाडे,अंबादास पुरी चालक गणेश म्हेत्रे सर्व ला.प्र.वि.बीड यूनिट यांनी कारवाई केली आहे.