राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकत,”सुपारीबाज चलेजाव” च्या घोषणा;बीडमध्ये ठाकरे गट,मनसे कार्यकर्ते भिडले
बीडमध्ये तणाव, परिस्थिती नियंत्रणात
click2ashti update-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.मात्र या दरम्यान चांगलाच गोंधळ उडाला.राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न करत मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या फेकून’सुपारीबाज चले जाव’ अशी घोषणाबाजी देखील दली. मात्र,ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागला.अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.नंतर परिस्थिती हाताशी आली.
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोर जावे लागले होते.मात्र,बीड जिल्ह्यामध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोश दिसून आला. राज ठाकरे यांच्या गाडीसमोर मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या फेकून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचा निषेध नोंदवला. ‘सुपारीबाज चले जाव’ अशा घोषणा देखील यावेळी ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आल्या.अखेर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.