आजी आमदारांचे खोट्या कामांच्या मंजुरीचे दावे;तर माजी आमदार सहा महिन्यांपूर्वी मयत कुटुंबांना भेटी देऊन सांत्वन करतात-माजी मंत्री धस
सुरेश धस यांच्या जनसंवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
click2ashti update-विधानसभा सदस्य नसताना देखील मी विधान परिषदेत विधानसभेप्रमाणे काम केले.मी लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्याला आणि मला मानणाऱ्या लोकांना सांगितले होते.मला कवड्यात कवड्या मिसळायच्या नाहीत.सध्या आजी-माजींचे जोरात गाव भेट दौरे चालू आहेत.मात्र या दौऱ्यात गेल्या सहा महिन्यापूर्वी मध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना भेटायसाठी माजी आमदार जात आहेत.तर आजी आमदार खोट्या मंजुऱ्याचे दावे करत गावागावात दौरे करताना पाहायला मिळत आहे. आणि सोशल मीडियावर देखील खोट्या मंजुरीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत.गावोगावी विकास कामांचे नारळ फोडायचे काम चालू आहे. आणि माणसांचा तर पत्त्या नाही असे चित्र पाहायला मिळत असल्याचाही टिका माजी मंत्री सुरेश धस यांनी आजबे,धोंडे यांचे नाव न घेता केली आहे.

आष्टी तालुक्यातील लोणी,दौलावडगाव व सावरगाव मायंबा या ठिकाणी रविवार (दि.11) रोजी आयोजित जनसंवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना धस म्हणाले,माझा कार्यकर्ता मी सत्तेत असो अथवा नसो परंतु तो कधीच कोणाच्या दारात गेला नाही.हे अभिमानाने मला सांगत त्यांचे आभार मानावे वाटतात.असे जीवाचे माणसे गोळा करण्यासाठी रात्रंदिवस त्यांच्या सेवेत राहुन काम आणि जनतेच्या सेवेत राहावे लागते.रात्री अपरात्री जरी दवाखाना,अपघात इतर कोणत्याही बाबीसाठी फोन आला तर मी आणि माझं धस कुटुंबीय तेवढेच तत्पर असल्यानेच एका मॅसेजवर जनता गोळा होते. कोरोना काळात किंवा इतर वेळेस हे आजी-माजी आमदार कुठे होते.गेल्या पाच वर्षात आता निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आजी-माजींनी निवडणुकीच्या तोंडावर गाव भेटी दौरे सुरू केले आहेत. कोरोना काळात ३३ विलगीकरण केंद्र व १३ कोविड सेंटर चालवत अनेकांना जीवदान देण्याचे काम माझ्या हातून झाले आहे.त्या काळात रात्रंदिवस मी जनतेसाठी सेवा करण्याचं काम करत होतो.कोरोना काळात औषध पेक्षा आधार देण्याची जनतेला आवश्यकता होती.आणि ते काम मी प्रामाणिकपणे केले.कोरोना काळात मतदार संघाचे आमदार व माजी आमदार कुठं होते? असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला.यावेळी लोणी येथील मेळाव्यास माजी जि.प.सदस्य दतोबा वाडेकर,भाजपा जेष्ठ नेते रमेश ढगे,जयशिंग गव्हाणे,माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे,सरपंच संजय रक्ताटे,उद्धव मोढवे पाटील,हनुमंत जंजिरे,अनिल गलांडे,शिवा पाटील वाळके,रामदास शेंडगे,बबन परकाळे,मनोज थोरवे, मयूर मोंढवे,नामदेव सायंबर,कृष्णा काकडे,बाबा मुठे,सरपंच सोमनाथ वाडेकर,राहुल सुरवसे,भवर सर,योगेश शेळके,राजु खुरांगे,दत्ता शेळके,सरपंच विकास अमृते,तर दौलावडगाव येथील मेळाव्यास
व्यासपीठावर माजी सभापती अशोक इथापे,सिद्धेश्वर ढोले,माजी सरपंच महेबूब शेख,विठ्ठल नाना अकोलकर,कारखेल सरपंच रघुशेठ घुले,केळ सरपंच सचिन दळवी, दौला वडगाव उपसरपंच बिबीशन दहातोंडे,वहाब पटेल,चेअरमन भास्कर थोरात,माजी सरपंच सचिन घुले,माजी सरपंच अशोक दहातोंडे, सालेवडगाव सरपंच महेश कराळे,माजी सरपंच शिवाजी थोरात आणि सावरगाव मायंबा येथील मेळाव्यास उपजिल्हाधिकारी पर्यटन विभाग संभाजीनगर जाधव साहेब,भाजपा तालुकाध्यक्ष अँड.साहेबराव म्हस्के,अध्यक्ष दादासाहेब चितळे,बाबासाहेब म्हस्के,ताठे पाटील साहेब, सरपंच पंढरीनाथ चंदनशिव,सरपंच पती मल्हारी शिंदे,पिंपरी (घाटा) सरपंच मोहन आमटे,सरपंच शेडाळा जावेद शेख,बुवासाहेब शेकडे,उपसरपंच गणेश वायभासे,शाम आबा तळेकर,माजी जि.प.सदस्य रावसाहेब शिरसाठ,माजी उपसभापती रमेश तांदळे,आदींसह पंचक्रोशीतील नागरिक,कार्यकर्ते,पदाधिकारी आदी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.