व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेतक-यांच्या हौसेला मोल नाही;लेकी प्रमाणे गाईचे घातले डोहाळं जेवण..!

किर्तन,मंडप थाटामाटात गाईच डोहाळ जेवण परिसरत चर्चेचा विषय

0

click2ashti update-आष्टी-हौसेला मोल नसते,मग कृषी संस्कृती जपणाऱ्या बळीराजा आपल्या परिवाराची नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो.कृषी संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या “गाईचे डोहाळे जेवण” आष्टी शहरातील अशोक सायकड या शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले.शेकडो लोकांच्या पगंती बसल्या.गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले महिलांनी गाईची ओटी भरली यानिमित्ताने मंडप व किर्तनाचे आयोजन करण्यात आले सगळ्या पाहुण्यांना जेवण घालून महिलांचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो अशाच पद्धतीने रितीरिवाज प्रमाणे गाईचे पुजन करण्यात आले.लाडक्या गायीचं डोहाळ जेवण धूमधडाक्यात केलं आहे.या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे.


आई होणं ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो,कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं गोड कौतुक करत असतात.पण आष्टी शहरातील एका शेतकऱ्याने लाडक्या गायीचं डोहाळ जेवण आज दि.११ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता धूमधडाक्यात केलं आहे.या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे.ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे.
“हौसेला मोल नसते” म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर,खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही.आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका.अशाच एक आष्टी येथील हौशी शेतकरी अशोक सायकड यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. तसेच महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला.एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो.अशाच प्रकारे सर्व रितीरिवाज पार पडले.मंडप घालण्यात आला,गायीला सजवून ओवाळण्यात आले. सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झाले.गायीला हिरवा चारा पंचपकवानाचे जेवण घालण्यात आले.आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता.नंतर ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. हौसी शेतकरी अशोक नाना सायकड,सोमीनाथ अशोक सायकड, तुकाराम अशोक सायकड या सायकड कुटुंबीयांच्या गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.यावेळी
सोमीनाथ अशोक सायकड यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले,आम्ही घरच्या गायीची छोटी कालवड उत्तम प्रकारे सांभाळली. आमच्या सर्व घरादाराला तिचा चांगलाच लळा लागला आहे. आता तिचे पहिले वेत आहे.आमची गाय फारच गुणवान आहे.आमच्या घरातील एक सदस्यच बनली आहे.आपल्या संस्कृतीमध्ये गायीला देव मानलं आहे.तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.
गाईला सजवले
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले.तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली.तिची शिंगे रंगवली गेली.गोंडे,गळ्यात घुंगुरमाळा,पायात तोडे घातले गेले.गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला.तसेच आनंदीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
कीर्तन नंतर पंगतही
डोहाळे जेवणासाठी लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी कीर्तनाचेही आयोजन केले होते.हे अनोखे डोहाळ जेवण आष्टी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.