सीना प्रकल्पातून मेहकरी धरणात पाण्याला सुरुवात पंधरा दिवसात मेहकरी धरण भरून घेणार-आ.बाळासाहेब आजबे
click2ashti update-आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण हे अद्याप पर्यंत कमी पावसामुळे भरलेले नाही पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे सीना धरणामध्ये कुकडीचे पाणी सोडण्यात आले आहे.सीना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे सीना धरणातून आज शनिवार 24 ऑगस्ट रोजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते बटन दाबून मेहकरी धरणात पाणी सोडण्यात आले.येत्या पंधरा दिवसांमध्ये सीना धरणातून मेहकरी धरण भरून घेण्यात येणार आहे असे यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.


शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सीना धरण येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते सीना धरणातून मेहकरी धरणात पाणी सोडण्यास बटन दाबून प्रारंभ करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे युवा नेते महेश आजबे अर्जुन काकडे,सुभाष वाळके सरपंच केशव आजबे उपविभागीय अधिकारी रमेश आडे,घोडेश्वर,शाखाधिकारी गावडे, यांच्यासह मान्यवर मंडळी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले,पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कुकडी धरण भरले आहेत.त्यामुळे कुकडी धरणातून बोसाखिंड मार्गे सिना प्रकल्पामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सीना धरणनात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे सीना धरणातून पुढील काळामध्ये मेहकरी धरणात पाणी सुरू राहणार आहे.सलग पंप हाऊस सुरू राहिल्यास येत्या पंधरा दिवसाच्या आत धरण पूर्णपणे भरेल मेहकरी धरण पूर्णपणे भरल्यास या भागातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.सध्या आष्टी तालुक्यामध्ये ही चांगला प्रमाणात पाऊस सुरू असून,सर्व तलाव जवळपास भरले आहे.

मेहकरी व इतर काही तलाव भरण्याचे बाकी आहेत सीना धरणातून व होणाऱ्या पावसाच्या पाण्यातून मेहकरी धरण लवकरच भरेल त्यामुळे पुढील काळात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्या पासून या भागातील शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.मागील वर्ष वगळता दरवर्षी आपण मेहकरी धरण भरून घेतले आहे.त्यामुळे आष्टी तालुक्यात पाण्याची टंचाई भासली नाही लवकरच शिंपोरा ते खुंटेफळ ही योजना ही पूर्ण होणार असून येणाऱ्या काळामध्ये दोन्ही योजनांच्या पाण्यामुळे आष्टी तालुका सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी पुडी,वाहिरा,हातोळण, घोंगडेवाडी, पारोडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.