व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुका ग्रामपंचायत निरीक्षक पदी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती

0

आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुलभ,पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत आष्टी ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील.त्या अनुषंगाने आष्टी तालुका निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक खर्चावर असणार लक्ष
उमेदवार आणि पॅनल प्रमुखांचा निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष लक्ष असणार असून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादीपेक्षा जास्त खर्च केला किंवा वेळेत खर्च दाखल केला नाही तर उमेदवार अपाञ होऊ शकतो.त्या अनुषंगाने या निवडणूकीत निवडणूक आयोगाचे खर्चावर विशेष लक्ष असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.