व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गेवराई आगाराच्या बसचा अपघात; पाच जण ठार

अंबड रोडवरील मठ तांड्याजवळ कंटेनर-बसची भीषण धडक

0

click2ashti update-गेवराई आगारातील बस आिण मोसंबी वाहून नेणारा ट्रक यांचा अंबड तालुक्यातील मठ तांडा येथे झालेल्या भीषण अपघातात वाहकासह पाचजण ठार झाले आहेत.अंबड तालुक्यातील सुखापुरी जवळ आज पहाटे हा अपघात झाला.
बीड-जालना रोडवर असलेल्या अंबड तालुक्यातील मठ तांडा येथे आज सकाळी गेवराई आगाराची बस आिण मोसंबी वाहून नेणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला.यामध्ये बसचे वाहक तथा एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू बारगजे यांचा जागीच मृत्यू झाला. यासोबत अन्य चार जण ठार झाले आहेत.बसचे चालक गोरख खेत्रे यांच्यासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.अपघातनंतर कंटेनरमधील मोसंबी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.