व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

0

मुंबई click2news-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.एका विशेष विमानाने त्यांना पुण्याहून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेअसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत.तसेच अजित पवार यांची जनसन्मान यात्राही राज्यभरात सुरू आहे.या दौऱ्यात झालेल्या धावपळीमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.छगन भुजबळ पुण्यात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली.यावेळी पुण्याहून विशेष विमानाची सोय करत त्यांना थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.