व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग

आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

0

बीड click2ashti राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे.
येत्या १२ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील दहा वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला ‘भगवान भक्तीगड’ असे नांव दिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.