विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे ट्विट; पंकज मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार
बीड click2asthi चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…! अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे दसऱ्याला सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला पालकमंत्री धनंजय मुंडे प्रथमच उपस्थित राहणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष मोठ्या तयारीने मैदानात उतरत आहे. बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते आिण जनतेशी संवाद साधला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या दरवर्षी भगवान भक्तगडावर दसरा मेळावा घेतात. या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते, नागरिक उत्साहाने उपस्थित राहून पंकजा मुंडे यांचे विचार ऐकतात. दरम्यान भगवान भक्तीगडावर शनिवारी (दि.12) होणाऱ्या दसरा मेळाव्यास प्रथमच पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे.यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.