आष्टी-तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून,राञीचे जेवण करून दरवाजा उघडा ठेऊन अंगणात कुटुंब झोपले असताना हीच संधी साधुन उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून घरातील दीड लाख रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री खरकटवाडी येथे घडली.
आष्टी तालुक्यातील देवळाली(पानाची)गावापासुन जवळच असलेल्या खरकटवाडी येथील मच्छिंद्र तान्हाजी तांदळे हे शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे जेवण करून घराचा दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपले असता त्याच रात्री संधी साधुन उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील दीड लाख रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घडली आहे.मच्छिंद्र तान्हाजी तांदळे याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात सोमवार दि.२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार लुईस पवार करीत आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.