राष्ट्रवादी काॅग्रेस नगरसेवक पुञासह दहा जणांवर गुन्हा दाखल;पाच जण अटक
नगर पंचायत निवडणूकीच्या आमच्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून एकाचा मृत्यू
आष्टी-येथील नगरसेविका कमल सुरवसे यांचा पुञ संतोष सुरवसे यांच्यासह दहा ते वीस जणांनी येथील सुरवसे कुटुंबियांना घरी बोलावून घराचे गेट बंद करून बेदम मारहाण केल्याची घटना 6 जानेवारीला घडली होती.या मारहाणीत जखमी असलेले तात्या बबन सुरवसे यांचा आज दि.९ रोजी उपचारा दरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी नगरसेविका पुञ संतोष सुरवसेसह अन्यवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादीसह मयत हे मारहाण केल्याच्या घटनेनंतर 6 जानेवारीला आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता नगरसेवक पुञ संतोष सुरवसे यांनी केस करू नका,परत घरी चला,घरी बसून भांडण मिटवू,असे म्हणत पोलीस ठाण्यातून बाहेर आणले.त्यानंतर फिर्यादी मयत तात्या सुरवसे हे संतोष सुरवसे यांच्या घरी गेले.या वेळी त्याठिकाणी संतोष सुरवसे,अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ,सागर चांगुले,सौरभ संतोष जाधव,अदित्य गोविंद मुरकुटे,प्रकाश रामा मुरकुटे,रवि छगन विटकर,रवी धोतरे व इतर सात ते आठ जण तेथे हजर होते.मयत व फिर्यादी घरात गेल्यानंतर अक्षय मुरकुटे याने घराचे गेट लावून घेतले व बाजुला ठेवलेले लोखंडी रॉड,तलवार,लाकडी दांडे घेेऊन अंगावर धावून आले.या वेळी नगरसेवक पुञ संतोष यांनी या लोकांनी निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध काम केले,आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.आम्ही या वेळी भांडण मिटवण्यासाठी आलो आहोत.तुम्ही अशी वागणूक का देता?असे विचारताच संतोष सुरवसेसह इतरांनी हातातील हत्याराने,लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.यामध्ये फिर्यादी नाना बबन सुरवसे,त्यांचा भाऊ तात्या बबन सुरवसे यासह अमोल मुरकुटे हे जखमी झाले.मारहाण करून संतोष सुरवसे व इतर तेथून निघून गेले.त्यानंतर जखमींना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र त्याठिकाणी पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले असता आज दि.९ रोजी सकाळी यातील जखमी तात्या बबन सुरवसे यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी आष्टी पोलिसात आधीच कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.पाच आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे.मात्र मुख्य आरोपी संतोष सुरवसे हा फरार आहे.सदरच्या खुनाच्या घटनेने आष्टीत खळबळ उडाली असून आरोपीच्या अटकेची मागणी मयताच्या कुटुंबियाकडून केली आहे.
तात्या सुरवसेवर अत्यंविधी राञी 6 वाजता
उपचारा दरम्यान मृत पावलेल्या तात्या सुरवसे यावर आष्टी शहरातील शेकापूर रस्तावरील खंडोबा मंदिराजवळील स्मशानभूमीत सांयकाळी 6 वा. अत्यंसंस्कार करण्यात आले.यावेळी शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.