व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

फिर्यादीच झाला आरोपी;मालकाला गंडा घालणारा नोकर गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेला आले यश

0

आष्टी-तालुक्यातील धामणगांवहून वसूली करून घेऊन चाललेले पैसे अज्ञात चोरांनी अडवून लुटून घेऊन गेल्याचा बनाव करून मालचाचे ३ लाख ११ हजार लंपास करून मालकाला गंठा घालणा-या गडी गजाआड करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी मंगळवार दिनांक 11/07/2022 रोजी धामनगाव शिवारात फिर्यादी आदेश गैतम बोखारे धंदा-खाजगी नौकरी रा.चौभा निमगाव हे व्यापाऱ्यांकडुन वसुल केलेले पैसे घेवून धामणगांव येथून कडे येथे जात असतांना मागील आलेल्या स्विप्ट कारने फिर्यादीस आडवुन दोन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवून फिर्यादी जवळील 3 लाख 11000/-रु असलेली पैशाची बँग जबरीने हिसकावुन नेली होती.त्यावरुन अंभोरा पोलिस ठाण्यात गुरनं पो.ठा.अंभोरा गुरनं 108 / 2022 कलम 392,34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हयातील आरोपीतांचा संमातर तपास करीत असतांना पो.नि.वाघ,स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनिय सुत्रधारामार्फत बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा हा इसम नामे आदेश गौतम बोखारे रा.चोभानिमगाव ता.आष्टी (फिर्यादी),महेश त्रिंबक करडुळे रा.धिर्डी ता.आष्टी यांनी संगनमताने केल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पो.नि.स्था.गु.शा.बीड यांनी नियोजन करून पथकास एक दिवस अगोदर पाठवून तंत्रशुध्द पध्दतीने तपास करून चोभानिमगाव येथुन वरील दोन इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर गुन्हा त्यांनी संगनमताने प्लान करून केल्याची कबुली दिली असुन सदर गुन्हयातील फिर्यादीने व्यापाराऱ्याचे पैसे लुटण्याचा प्लान केला होता.व लुटलेल्या मालाची अर्धी-अर्धी रक्कम वाटुन घेण्याचे ठरले होते.आरोपीताचे ताब्यातुन मिळालेल्या रक्कमेचा पंचनामा करण्यात आला असून वरील दोन्ही आरोपी व मुद्येमाल पो.ठा.अंभोरा यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.सदर आरोपीतांकडुन मालाविरुध्दचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.पुढील तपास अंभोरा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सतिष वाघ,स्था.गु.शा.बीड,पोउपनि दुलत,सफौ शेख सलीम,पोह मनोज वाघ,पोह,रामदास तांदळे,पोह प्रसाद कदम,पोना विकास वाघमारे,पोना सोमनाथ गायकवाड,पोशि विकी सुरवसे सर्व नेम.स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.