व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पी आय साहेब तुमच्या घरच्या रस्तावरच्या नाही तर शहरातील रस्तावर लावलेल्या गाड्या बघा…

नो पार्कींग मध्ये लावलेल्या गाडीचा दोन हजार रूपये दंड

0

आष्टी-शहरातील अस्त-व्यस्त लावलेल्या मोटार सायकल वर दंड करण्याऐवजी आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी त्यांच्या घराकडे जाणा-या रस्तावर आडव्या तिडव्या लावलेल्या चार वाहनावर कारवाईचा आव आणत ठाण्यात नेल्या व घेऊन गेलेल्या वाहनावर शंभर,दोनशे नाही तर दोन ते अडीच हजार रूपायांचा अजब दंड पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगीतले.अचानक अवतरल्या खाकीला आता म्हणावं तरी काय?पी आय साहेब तुमच्या घराकडे जाणा-या रस्तावर नाही तर शहरातील रस्तांवर येऊन चक्कर मारा अन् बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करा अशी मागणी जनतेतून होत आहे.
आष्टी शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिस कधीच पुढे येत नाहीत.पण आज बुधवार दि.२५ रोजी दुपारी ३.३० वा.नगर पंचायत कार्यालयाच्या पाठीमागे आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांचे घर असून,ते घरी जात असतांना तीन चार मोटारसायकल सिताई हाॅटेल समोर दिसल्या व पी आय साहेबांच्या खाकी वर्दी जागी झाली.अन् समोर लावलेले वाहन ठाण्यात घेऊन गेले.ठाण्यात घेऊन गेलेले वाहनावर शंभर,दोनशे किंवा पाचशे नाही तर चक्क दोन हजार रूपये दंड या राग आलेल्या पी आय साहेबांनी सांगितला.
या अचानक प्रकटलेल्या साहेबांनी तुमच्या स्वत;च्या घराकडे जाणा-या रस्तावर नाही तर व्यापार पेठेतील रस्तावर लावलेल्या अस्त-व्यस्त लावलेल्या वाहनांवर कारवाई करा अशी मागणी जनतेतून होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.