आष्टीत दोन दिवस भरणार शिवकालीन शस्ञे,ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन;विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
शिवजंयती महोत्सवाची जयत्त तयारी
आष्टी-यावर्षीचा शिवजंयती महोत्सव उत्साहात पार पडणार असून,आठ दिवस या महोत्सावात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार असल्याची माहिती आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाने दिली आहे.
आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्यावतीने आज गुरूवार दि.९ रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत पदाधिकारी बोलत होते.शिवजंयती महोत्सावाला शनिवार पासून सुरूवात होत असून,दि.११ रोजी सांयकाळी ६ वा शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान,दि.१३ सोमवारी शिवकालीन गोंधळ वाघ्या मुरळी सह,दि.१५ बुधवार रोजी शाहिर तुकाराम काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम तर दि.१६-१७ रोजी शिवकालीन शस्ञे,ऐतिहासीक वस्तू प्रदर्शन दि.१८ रोजी मर्दानी खेळ तर दि.१९ रोजी सकाळी १० वा.शिवध्वजारोहण तर सांयकाळी विना पोलिस बंदोबस्तात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
तालुक्यातील शाळेंनी सहभाग नोंदवावा
शाळेतील विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराजांनी हातळलेले शस्ञ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर,सातारा या ठिकाणी जावे लागते पण हि संधी आपण आष्टी शहरात उपलब्ध केली असून,दोन दिवस हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी १८ वर्षा पर्यंत मूलांना १० रूपये तर प्रौढ व्यक्तींना ३० हे नाममाञ दर ठेवण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगीतले.
विना डिजे,विना अध्यक्ष व विना पोलिस बंदोबस्तात शिवजंयती
गेल्या सात वर्षापासून शहरातील छ.शिवाजी महाराज यांची जयंती विना डिजे,विना अध्यक्ष व विना पोलिस बंदोबस्तात हि शिवजंयती साजरी करण्यात येते.एवढेच नाही तर शिवजंयतीमध्ये नागरीकांनी दिलेल्या वर्गणीचा व जंयती साठी खर्च झालेल्या हिशोबाचा तपशिलही चौकात जाहिर करण्यात येतो.