व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत शिवकालीन वस्तु प्रदर्शानास सुरूवात; छ.शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाचे कार्य कौतुकास्पद-अजय दादा धोंडे

विविध शाळेंनी नोंदविला सहभाग

0

आष्टी-यावर्षी छ.शिवाजी महाराज जंयती निमित्त शहरात आठ दिवसापासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,आज दि.१६-१७ रोजी आष्टीत छ.शिवाजी महाराज यांनी हातळलेले व त्यांच्या काळातील असलेल्या वस्तु प्रदर्शनास सुरूवात झाली असून, छ.शिवाजी महाराज मिञमंडळ चौक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय भिमराव धोंडे यांनी केले.
आष्टी शहर शिवजंयती महोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून विविध उपक्रमांनी सुरू आहे.आज गुरूवार दि.१६ व शुक्रवार दि.१७ रोजी दोन दिवसीय छ.शिवाजी महाराजांनी वातरलेले शस्ञ व त्यांच्या काळातील साहित्यांचे प्रदर्शन शहरातील छ.शिवाजी महाराज चौक येथे भरविण्यात आले आहे.या प्रदर्शाचे उद्याटन युवानेते अजय धोंडे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी जि.प.सदस्य खंडू दादा जाधव,सुनिल रेडेकर,ज्योतीबा रेडेकर,पञकार सचिन रानडे,गणेश दळवी यांच्यासह आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना धोंडे म्हणाले,गेल्या आठ वर्षापासून शहरातील शिवजंयती हि इतरांना आदर्श ठरत असून,विना अध्यक्ष,विना डिजे व विना पोलिस बंदोबस्तात हि शिवजंयती होत आहे.कायम सामाजिक कार्य करत ह्या छ.शिवाजी महाराज चौक मिञमंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले.पहिल्या दिवशी गुरूवारी शहरातील शाळेंनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून येत आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी १८ वर्षा पर्यंत १० रू तर १८ वर्षापुढील व्यक्तीसांठी ३० रू,असे माफक दर ठेवण्यात आले आहेत.तरी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन छ.शिवाजी महाराज मिञमंडळ चौक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.