व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पञकार रघुनाथ कर्डिले आज होणार द्वारका प्रतिष्ठानच्या आदर्श पुरस्काराने सन्मानीत

0

आष्टी-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज शुक्रवारी कडा येथील द्वारका प्रतिष्ठान आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून,यावेळेचा आदर्श पञकारितेचा पुरस्कार आष्टी तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक पण्यनगरी व लोकप्रश्न चे तालुका प्रतिनिधी रघुनाथ कर्डिले यांना जाहिर झाला असून,त्यांना आज शुक्रवार दि.१७ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज शुक्रवारी कडा येथील द्वारका प्रतिष्ठान आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रा.अविनाश भवर यांनी दिली.यामध्ये बाबासाहेब हिराजी शेकडे,अधीक्षक धर्मादाय आयुक्त कार्यालय,बीड,’राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार,गजानन कृष्णराव कुलकर्णी,संचालक ज्ञानेश नंदनी प्रतिष्ठान संचलित चैतन्य गोशाळा देवळाली पानाची-राज्यस्तरीय आदर्श गोपालक पुरस्कार,अमोल बाळासाहेब कर्डिले,जिल्हास्तरीय आदर्श व्यावसायिक पुरस्कार,अमित आणि सुमित बाळासाहेब ढोबळे-जिल्हास्तरीय आदर्श व्यावसायिक प्रोत्साहन पुरस्कार,भुकन रामेश्वर श्रीधर,टाकळी अमिया तालुका आष्टी-राज्यस्तरीय आदर्श संस्कृती रक्षक पुरस्कार,सौ शिल्पा संजय देवडे,जनसंपर्क अधिकारी आरंभ पोलिटिव्ह कॅन्सर केअर सेंटर,अहमदनगर-राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार,रघुनाथ तुकाराम कर्डिले,पत्रकार पुण्यनगरी-राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार,महेश कल्याण सांगळे,संचालक महेश उद्योग समूह कडा,जिल्हास्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार यांचा समावेश आहे.सदरील कार्यक्रम द्वारका प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजता होणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा. भवर यांनी केले आहे.पञकार रघुनाथ कर्डिले यांचे आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे,जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,झुंजार नेता उपसंपादक उत्तम बोडखे,भिमराव गुरव,शरद तळेकर,शरद रेडेकर,संतोष सानप,प्रविण पोकळे,सचिन रानडे,मनोज पोकळे,गणेश दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.