पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या ३३ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा; २० युवकांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलवले
आष्टी शहरातील घटना; आमदार सुरेश धस यांनी घेतली माहिती
आष्टी click2ashti-शहरितील एका खाजगी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी रात्रीच्या जेवणामुळे ३३ युवकांना विषबाधा झाली आहे.या अकॅडमीत आष्टी तालुक्यासह इतर तालुक्यातील शेकडो युवक प्रशिक्षण घेत आहेत.शुक्रवार रात्री जेवल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी होऊ लागली.सगळ्याच युवकांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.यातील २० युवकांना आहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहेत.या घटनेची सखोल माहिती आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी शहरातील टायगर अकॅडमीमध्ये भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी ३३ विद्यार्थी आहेत.त्यांनी नेहमीप्रमाणे युवकांना शुक्रवार (दि.२८)रोजी रात्री ९ च्या सुमारास जेवण दिले.यामध्ये हुलग्याची भाजी,भाकरी,भात दिला.परंतु मध्यरात्री दिडच्या सुमारास काही युवकांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागला हळूहळू सर्वच युवकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यातील काही युवकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविण्यात आले आहे.या विषबाधेमुळे अभिजीत अंगद शेळके,विकास आप्पासाहेब धुमाळ,सायली बाळू मांडगे,शिवाजी भाऊसाहेब धनवडे, आकाश आप्पा बांगर,सनी मोहन डफाळ,सुभाष खंडू धोत्रे,गोकुळ नाथा धुमाळ,सुभाष सोमीनाथ धोत्रे,कृष्णा सुरेश पांडुळे, रोहन संजय शेळके,प्रणव सर्जेराव भोसले,ऋषिकेश रामदेव खाडे,गणेश संजय नरवडे,आकाश रावसाहेब डफळ,विकास साहेबा फुलमाळी,रोहित बजरंग जगताप,गौरी काकासाहेब पाटील,विद्या विजय बोराडे, नेहा अशोक बारखेड,रोहित धर्मराज धनवडे,करुणा संतोष खंडागळे,रोहित रामभाऊ रोडे,अशोक उत्तम शेळके,विमल सुदाम देशमुख,मनीषा सायकड,प्रज्वल काकडे,सुनिता महात्माजी वाहटुळे,अनिरुद्ध बापूराव मिसाळ,मंगल संभाजी भोंगाळे,करण महादेव शेळके,राम प्रकाश शिंदे,दीक्षा गोरख गजघाट,हर्षद बबन कदम,देवकाते मयूर भीमसेन,कुदनाने किरण भाऊसाहेब,राहुल कैलास साबळे,आसिफ इनुस शेख,सुरज महादेव डोके,अशोक गवाजी रूपकर,आयान पठाण यांना झाली आहे.
प्रशिक्षणार्थीना वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कारण नाही-तहसिलदार वैशाली पाटील
सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर आहे. नेमकी विषबाधा का झाली याची चौकशी करू,ज्या युवकांची प्रकृती गंभीर आहे ते त्यांना पुढील उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविले आहे.सर्व युवकांना वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कारण नाही.
–वैशाली पाटील(तहसिलदार आष्टी)
मला काही माहिती नाही सीएसला विचारा-डॉ.पवार
याबाबत आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पवार यांना एवढी मोठी विषबाधेची घटना घडल्याने पत्रकारांनी माहिती विचारण्यासाठी फोन केला असता मी आठ दिवसांपुर्वीच वैद्यकीय अधिक्षक पदाचा राजीनामा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठविला आहे.तुम्ही सीएस यांनाच विचारा असे सांगितले.