व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आनाथांचा “नाथ”हरवला

डोमरी गुरूकूलचे सर्वेसर्वा सुदाम भांडवे सह चार जणांचे अपघाती निधन

0

बीड-पुणे-नगर रस्त्यावर,कारेगाव (ता.शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले.मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.
मंगळवार दि.२१ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक गंभीर जखमी झाला. सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०),कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे,सर्व रा.डोमरी,ता. पाटोदा,जि.बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून,अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले.ते वाहन चालवित होते.त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे,आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र.एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते.दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र.एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली.यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला.या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार,संतोष औटी,विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले.अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.