विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवल्यास यश नक्की मिळते-डॉ.विलास सोनवणे
आष्टी नागरी पतसंस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न
आष्टी click2ashti-स्पर्धेच्या युगात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च पालकांना सोसावा लागतो.इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च असतांना आपले आईवडील कोणत्या परिस्थितीतून जातात याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवल्यास यश नक्की मिळत असल्याचे प्रतिपादन डॉ.विलास सोनवणे यांनी केले.
आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टीच्या वतीने रविवार (दि.२९)रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.विलास सोनवणे बोलत होते.यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष नवनीत कटारिया,पत्रकार उत्तम बोडखे,निर्मला सोनवणे,विद्या चव्हाण आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ.सोनवणे म्हणाले,सध्याच्या काळात अभ्यासक्रमामध्ये खुप बदल झाला आहे.स्पर्धेच्या युगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे.विद्यार्थ्यांनी आपली परिस्थितीची जाण लक्षात ठेवली पाहिजे त्यासाठी व्यासनाधिन न होता निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे.जर आपण आपलं सगळं लक्ष आपल्या भविष्याकडे दिले आणि परिस्थितीची जाणिव ठेवली तर यश नक्कीच मिळते असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद थोरवे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव काकासाहेब पोकळे यांनी मानले.