आष्टी click2ashti-मतदार संघातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलाव, आष्टी-आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग व अहिल्या नगर ते बीड रेल्वे मार्गांचे राहिलेले भू-संपादन तात्काळ करून या कामात तारीख पे तारीख न देता तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश आमदार सुरेश धस यांनी दिले.
आष्टी तहसिल कार्यालयात शनिवार (दि.२६)रोजी दुपारी १ वा.आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ.धस बोलत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी वसिमा शेख,तहसिलदार वैशाली पाटील,नायब तहसीलदार भगिरथ धारक यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,प्रकल्प रखडू नयेत यासाठी भूसंपादनाचे काम मिशन मोडवर आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावे.त्यासाठी दिलेली टाईमलाईन तंतोतंत पाळावी,अन्यथा प्रकल्प खर्चात मोठी वाढ होते आणि जनतेला अपेक्षित सेवा वेळेवर मिळत नाही.आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट निर्देश दिले की,
खुंटेफळ साठवण तलावाचे कामात कोणीही हालगर्जिपणा करू नये,हा तालुक्याच्या व माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे.तसेच आष्टी- आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग,आहिल्यानगर-बीड रेल्वे मार्ग यावरील भूसंपादन तसेच शेतक-यांच्या अडी-अडचणी तात्काळ दुर करून हे सर्व कामे तात्काळ मार्गी लाऊन प्रशासकीय प्रक्रियेला एकत्रित गती देण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.सुमारे चार तास आमदार धसांनी अधिका-यांची झाडाझडती घेत सुचना दिल्या.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.