व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भाजपा पदाधिकारी निवडीत अपक्ष समर्थकांना पदे;आमदार धस समर्थक संतप्त

0

गणेश दळवी आष्टी-बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारी पार पडली मात्र यामध्ये आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अपक्ष उमेदवारांचा जाहीर प्रचार करत व्यासपीठावरून भाजप उमेदवारांना पराभूत करण्याची भाषा वापरली अशाच लोकांची पदाधिकारी म्हणून निवड केल्याने भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचा सुरू उमटला असून या निवडी म्हणजे उघडपणे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून घेणाऱ्या पंकजाताईंनी एकंदरीतच आष्टी विधानसभेचे आ.सुरेश धस यांचा निवडणुकी काळा दरम्यान जाहीरपणे विरोधी प्रचार केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब केल्याचा प्रकार मतदारसंघात दिसत आहे.
मंगळवार दिनांक 26 रोजी बीड जिल्हा भारतीय जनता पक्ष कार्यकारणी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या पत्राद्वारे सोशल मीडियावर टाकण्यात आली मात्र यावेळी संबंधित जिल्हाध्यक्षांनी नामदार पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आल्याचे स्पष्टपणे आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सांगितल्याने ही निवड जिल्हाध्यक्ष यांनी केली की त्यांना मंत्री पंकजा मुंडे यांनी सुचविले यावर देखील आष्टी मतदार संघात तीव्र नाराजीचा सूर आमदार सुरेश धस समर्थकांमध्ये दिसून येत आहे त्याचे कारण असे की नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश धस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळावर ही निवडणूक लढविली आणि मोठ्या मतांच्या फरकाने आष्टी विधानसभा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले मात्र याचवेळी ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार असलेल्या भीमराव धोंडे यांचा जाहीरपणे व्यासपीठावरून प्रचार केला आणि पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्त केलेले रामदास बडे यांनी गाव बैठकीत सांगितल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मंगळवार रोजी दिवसभर व्हायरल होत असताना याच रामदास बडे यांना जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले तर आणखी देखील जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी देखील विधानसभेला पक्ष विरोधी भूमिका घेतली होती त्यामुळे ज्यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडले अशा लोकांना पदनियुक्ती देऊन भारतीय जनता पक्षाने नेमका कोणता संदेश दिला असा सवाल आता सर्वसामान्य जनतेसह धस समर्थक विचारत आहेत.
जिल्हाध्यक्षांची नेमकी भूमिका काय?
मंगळवारी पदनियुक्त केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नावांची यादी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी जाहीर केली मात्र या पोस्टमध्ये त्यांनी ही निवड मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आले असल्याचे सांगत एक प्रकारे या निवडीमध्ये नेमके त्यांना विश्वासात घेतले नाही की त्यांनीच या निवडीमध्ये सहभाग घेतला नाही असे एकंदरीत दिसून येत असल्याने जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी देखील विधानसभेला भारतीय जनता पक्षाचे काम खरच केले आहे का यावर देखील आता शंका येत असल्याचे मत धस समर्थक व्यक्त करत आहेत.
धसांच्या आरोपात तथ्य?
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी आमदार सुरेश धस यांनी आपल्या विजयी सभेत जाहीरपणे पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला होता त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप पर्यंत विस्तवही जात नाही त्यातच मंगळवारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडीमध्ये जिल्हाध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार जर पंकजा मुंडे यांच्या आदेशाने या नियुक्त जाहीर करण्यात आल्या असतील तर धसाच्या आरोपात तथ्य असल्याचे एकंदरीत चित्र दिसत असून भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यावर नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.