व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

उंदरखेल तलाव फुटल्याची बातमी निव्वळ अफवा;नागरिकांनी घाबरू नये तहसीलदार वैशाली पाटील

0

click2ashti-तालुक्यातील उंदरखेल येथील तलाव फुटल्याची एक बातमी वेगाने पसरत आहे.मात्र,ही बातमी पूर्णपणे खोटी असून ती एक अफवा असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहे.परिसरातील नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज सोमवार (दि.१५) सोशल मीडियावरील विविध ग्रुप्सवर “उंदरखेल तलाव फुटला”अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर,तहसीलदार वैशाली पाटील यांनी तातडीने खुलासा करत म्हटले आहे की,”उंदरखेल तलाव फुटल्याची माहिती पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे.प्रशासनाकडे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.कोणीतरी जाणूनबुजून ही अफवा पसरवली आहे.जर भविष्यात अशी कोणतीही धोक्याची परिस्थिती निर्माण झाली,तर प्रशासनामार्फत अधिकृतपणे सतर्कतेचा इशारा देण्यात येईल.तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे पाठवू नये.”प्रशासनाच्या या स्पष्टीकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच,अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.