व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दादांचा,वादा;महेश सहकारी साखर कारखान्याची परवानगी दिल्लीवरून आणू-उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी आ.भीमराव धोंडे यांचा मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह पक्षप्रवेश संपन्न

0

click2ashti-राजकारण व समाजकारण करताना कुणी राजकारण्यांनी सत्तेचा गैर करु नये.सत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नसतो.सतत पाय जमीनीवर ठेवुन चालावे.नाशिक, अहिल्यानगर आणि आष्टी भागातही बिबटे आहेत.यांचा तर बंदोबस्त करायचाय आष्टीतील दुसऱ्या बिबट्याचाही बंदोबस्त करु.आता बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधी गटाला अस्मान दाखवा.कोणत्याही राजकीय पक्षात कार्यकर्त्यांच्या होणारा प्रवेश हा बेरीजच वाढवितो.कार्यकर्त्यांमुळे संघटना पक्ष वाढत असतो. मलाही पद मिळावे असे कार्यकर्त्यांना नेहमी वाटत असते.धोंडेसाहेब तुमच्या महेश सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स मिळवुन देण्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहु.सहकार विभागाला या संदर्भातील कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.आपण अमित शहा यांना यासाठी भेटु.शिवाय तुमच्या स्वप्नातले ५०० बेडचे कॕन्सर हाॕस्पीटल उभारणीसाठी सीएसआर फंड उपलब्ध करुन देऊ.बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुषविण्याची संधी मिळाली आहे.येथे विमानतळ उभारायचेय.बीड ते हडपसर अशी रेल्वे लवकरच सुरु करुया.भविष्यात विद्युतवर बीड ते मुंबई अशी रेल्वेही सुरु करण्यात येणार आहे असे सांगत भीमराव धोंडेसाहेब तुमचा व बाळासाहेब आजबे आपल्या दोघांचाही पार्टीत योग्य सन्मान व आदर केला जाईल.शेतकऱ्यांनी आता कृत्रीम बुध्दीमत्ता वापरुन शेती करावी.नवनवीन टेक्नॕलाॕजीने जग जवळ आलेले आहे.धोंडेसाहेब तुमच्या साखर कारखान्याचे परवान्यासाठी अमित शहा यांच्याकडे जाऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांनी दिले.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीजवळील सभागृहात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आ.विजयसिह पंडीत,आ.शिवाजीराव गर्जे,माजी आ.बाळासाहेब आजबे,जिल्हाध्यक्ष राजेश्वर देशमुख,सुरजभैय्या चव्हाण,कल्याण आखाडे, आक्रुरशेठ कुदळे,संध्याताई सोनवणे,डाॕ.अजय धोंडे,अभय धोंडे,संतोष जाधव, हनुमंत थोरवे,दिलीप फरांदे,संतोष चव्हाण,रुपेश बेदरे,भाऊसाहेब लटपटे,शिवाजी नाकाडे,विश्वास नागरगोजे,दशरथदादा वनवे, बाळासाहेब पवार,दिलीप म्हस्के फौजी,नियामत बेग, पांडुरंग नागरगोजे,सुरेश माळी,सतिषमामा झगडे,इंदुबाई गोल्हार,सावता ससाणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे बोलताना म्हणाले की,अजित पवार हे माझे परिचयाचे नेतृत्व आहे.मागे काँग्रेसमध्ये आम्ही एकत्रित काम केलेले आहे.मी आमदार असताना दादा मंत्री होते.दादा हे धडाडीचे व करारी नेतृत्व आहे.त्यांच्या कामाचा मला अनुभव आहे.आष्टी विधानसभा मतदार संघात सध्या लोकप्रतिनिधींची धाकदडपशाही,दादागिरी सुरु आहे.अजितदादा तुमच्या सहकार्याने त्यांची ही दादागिरी दडपशाही लोकशाही मार्गातुन संपयची आहे. घड्याळ चिन्हावर आम्ही निवडणुक लढवुन स्थानिक स्वराज्य संस्था जिंकुन दाखवु असे आश्वासन दिले.आष्टी,पाटोदा,शिरूर का. विधानसभा मतदार संघाचा यापुढेही खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूपात विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून मतदार संघातील जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि शेतकरी शेतमजूर आणि सर्व घटकांच्या इच्छेखातर आपण दीर्घकालीन शाश्वत विकास खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) पक्षात आपण प्रवेश घेत असल्याची स्पष्टोक्ती केली.माजी आ. भीमराव धोंडे हे मंगळवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षात मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला.यावेळी बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,मी एक सामान्य जनतेच्या हितासाठी झटणारा कार्यकर्ता आहे. भाजपमध्ये असतानाही प्रमाणिकपणे जनहितासाठी कार्य केले त्या पक्षातुन मला निलंबीत केल्यानंतर मी यापुढे विधानसभा मतदार संघातील दीर्घकालीन शाश्वत विकास योजना आणून मतदार संघाचा विकास घडावा या व्यापक हेतूने हा पक्ष प्रवेश करत आहे. मराठवाड्यातील विशेष असे कॅन्सर हॉस्पिटल तसेच शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला महेश (कडा) सहकारी साखर कारखान्यासाठी पुन्हा गतवैभव निर्माण करून देण्याच्या हेतूनेसुद्धा शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वासही माजी आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही छोट्या-मोठ्या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग दाखवून पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी यश मिळवून देणार असाही ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी माजी आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की,प्रत्येकाला अडचण आणणारा आमदार आष्टीत करुन ठेवला आहे. गोरगरीबाला आष्टीच्या विद्दमान आमदाराचा त्रास होत आहे. महेश साह.साखर कारखाना सुरुच झाला पाहिजे.आपले राष्ट्रवादीचे रनींग आमदारांनी अजितदादा पवार यांना याबद्दल सांगा असे सांगत आष्टी मतदार संघाची मोट बांधुन धोंडेसाहेब वमी जि.प.व पं.स निवडणुक जिंकु असे माजी आ.बाळासाहेब आजबे आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर देशमुख,काकासाहेब शिंदे (आष्टी तालुकाध्यक्ष),दिपक घुमरे (पाटोदा तालुकाध्यक्ष),दशरथदादा वनवे यांचे समयोजीत भाषणे झाले.
यांचा झाला राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी आ.भीमराव धोंडे,डाॕ.अजय धोंडे,राजेंद्र धोंडे, माजी सभापती नियामत बेग,उपसभापती पांडुरंग नागरगोजे, संतोषभैय्या चव्हाण,जि.प.सदस्य सुरेश माळी,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब जगताप,अशोक साळवे,माजी सभापती अनिल जायभाये,उद्योगपती सावता ससाणे,ॲड. रत्नदीप निकाळजे, बाबुशेठ भंडारी, विठ्ठलराव लांडगे,शेख अस्ताकभाई शेख,शहानवाज पठाण,मधुकर ढाकणे,बबन औटे,प्राचार्य जे.सी.शेख,संजय धायगुडे,छगन तरटे,अमोलभैय्या चौधरी,युवराज खटके,सुदामकाका झिंजुर्के,हरिभाऊ जंजीरे,पांडुरंग गावडे,अंकुश मुंढे,माजी सभापती भाऊसाहेब धनावडे,विठ्ठल डोंगर पाटील,चेअरमन बाळासाहेब शिंदे, भागवत वारे,महारुद्र खेडकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.