व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेंडगेवाडी(सावरगाव गड)येथे ऊसतोडणी कामगारांवर दुर्दैवी अपघात,चौदा जण गंभीर जखमी;आ.सुरेश धस तातडीने घटनास्थळी दाखल

0

click2ashti-आष्टी-शेंडगेवाडी(सावरगाव गड),ता.आष्टी येथील ऊसतोडणी कामगारांवर आज पहाटे भीषण अपघात झाला. वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव–शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या चेसिस वाहनाने अचानक आपला ट्रॅक सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाड्या सुमारे 200 फूट फरफटत गेल्या. सदरील घटनेची माहिती मीच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
या अपघातात पाच बैलांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच एकूण 14 ऊसतोडणी कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पूजा नाना शेंडगे (वय 30) व शरद शेंडगे (वय 40) यांना पुढील उपचारासाठी इंपल्स हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 12 जखमी कामगारांवर तिसगाव येथील श्री. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.जखमींमध्ये अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगल, राणी ठेंगल, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे, अशोक ठेंगल व तुळजाई शेंडगे यांचा समावेश आहे. अनेकांना गंभीर इजा व हाडांचे फ्रॅक्चर झाले आहे.गुरुवारी पहाटे सुमारे 6 वाजता सदरील घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनाला तातडीने कळविण्यात आले. त्यामुळे जखमींना तत्काळ मदत मिळून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अधिकारी केदार साहेब व पालवे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन डॉ. रानसिंग यांच्याकडून उपचारांची धस यांनी माहिती घेत रुग्णांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पुजारी साहेब यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.