व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला एकाचा मृत्यू;अन्य दोन गंभीर जखमी !

आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील घटना

0

click2ashti-सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी,स्टेटस टाकण्याच्या कारणावरून कुरापत काढून झालेल्या वादात तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.उपचारासाठी घेऊन जाताना यातील एकाच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रूईनालकोल येथे सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. दिपक शिवाजी नालकोल वय (वर्ष २०) रा.रूईनालकोल ता.आष्टी असे मृताचे नाव आहे.तर जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जि.प.शाळेच्यासमोर सोमवारी तरूणाच्या दोन गटात इंन्टाग्राम,हाॅटसपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद झाला.यात वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तिघाजणांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तिघे गंभीर जखमी झाले.जखमी तरूणांना उपचारासाठी घेऊन जाताना दिपक नालकोल यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तर अन्य दोन जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.घटनास्थळी आष्टीचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,विक्रांत हिंगे,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,याच्यासह अंमलदारांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.