आष्टीचे भेसळ दूध पुण्यात…! आष्टी तालुक्यात भेसळ दूधाचा महापूर;अन्न व औषध प्रशासन माञ सुस्त
आष्टी-तालुक्यात दुधात भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे.मात्र,याकडे अन्न व औषध प्रशासन पुरते दुर्लक्ष करत असून तक्रार आली तर भेसळ होत असलेल्या ठिकाणी जाऊन थातूरमातूर कारवाई करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जातात.काल झालेली एवढी मोठी दूध भेसळची कारवाई आष्टी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला फोन केल्यानंतर हे येथे येतात अन् थातूर मातूर कारवाई करून निघून जातात.
आष्टी शहरात काल अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत दुध भेसळ अड्ड्यावर छापा टाकला.दूध भेसळ सोल्यूशन,रिफाइंड खोबरेल तेल व डेअरी पर्मिट पावडर तसेच भेसळयुक्त गाय व म्हशीचे दूध असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो ताब्यात घेतला गेला.मात्र,आष्टीत झालेली कारवाई ही एकाच केंद्रावर कारवाई झाली आहे.मात्र,दुधात भेसळ करणाऱ्या अनेक छोट्या- मोठ्या केंद्राकडे अन्न व औषध प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? तिकडे का कारवाई करून भेसळ धंदा बंद होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.आष्टी शहरातील जगदंबा मिल्क सेंटरचा मालक सतिष शिंदे हा दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पाठवत असल्याचे पोलिस तपासात निषपन्न झाले.तर भेसळीसाठी लागणारी पावडर ही पुणे जिल्ह्यातील नातेपूते येथून आणल्याचे निषपन्न झाले माञ भेसळीसाठी रसायन कुठून आणले जाते हे अघ्याप स्पष्ट झाले नाही.
दररोज होते हजारो लिटर भेसळ दूध तयार
आष्टीत केवळ भेसळच केली जात नव्हती तर रसायन आणि पावडर वापरून दूधच तयार केले जात होते.रोज हजारो लिटर दूध तयार करून,त्याची इतर दूधात बेमालपणे भेसळ केली जात होती.
आज न्यायालयात नेणार
दूध भेसळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला आज शुक्रवारी पोलिस न्यायालयात हजर करणार असून,या बनावट दूध प्रकराची साखळी शोधण्यासाठी त्याची पोलिस कोठडी पोलिसांकडून मागीतली जाईल.दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी सतिष शिंदे यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.