व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अंजली धर्माधिकारी यांचे निधन

मायंबा टाईम्सचे संपादक अनिरूद्ध धर्माधिकारी यांना मातृशोक

0

click2ashti-येथील श्री दत्त मंदिर गल्ली परिसरातील रहिवासी अंजली अरविंद धर्माधिकारी (वय ७९) यांचे दुःखद निधन झाले.त्या सिद्धी कॉम्प्युटरचे संचालक अभय धर्माधिकारी,दैनिक सकाळचे वार्ताहर अनिरुद्ध धर्माधिकारी तसेच ॲड.अंबरीश धर्माधिकारी यांच्या मातोश्री होत्या.
अंजली धर्माधिकारी यांच्या निधनाने धर्माधिकारी कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता खंडोबा मंदिर स्मशानभूमी,शेकापूर रोड,आष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.