दूध भेसळ प्रकरणी आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी;एक आरोपी अजूनही फरार
आष्टी न्यायालयात केले हजर
आष्टी-शहरांमध्ये बुधवारी रात्री आष्टी पोलीस व अन्य औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये दूध भेसळ करण्याचे नऊ लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले होते तर नंदु मेमाणे या आरोपीस पकडण्यात आले होते.त्याला शुक्रवारी आष्टी न्यायालयात समोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे.
आष्टी शहरातील संभाजीनगर या भागामध्ये आष्टी पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाने बनावट दूध निर्मितीचा पर्दाफाश केला असून यामध्ये एक आरोपीला अटक केली आहे तर बनावट’ दूध बनवत दूध निर्मितीचे जवळपास नऊ लाख रुपयाचे साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सदरील साहित्य कुठून आणले व त्याचा वापर कसा करीत होता.