व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मांडवेश्वर यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा;याञेत रूपाली पाटील यांचा होणार तमाशा

ग्रामस्थांनी केले अहवान

0

आष्टी-तालुक्यातील मांडवा या श्री क्षेत्र मांडवेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्सव बुधवार दि.२१ उत्सवाला प्रारंभ होणार असून,याच दिवशी राञी ७ वा.रूपाली पाटील यांचा तमाशा होणार असून,या लोककलेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे अहवान मांडवा गावक-यांनी केले आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी आष्टी तालुक्यातील मांडवा गावची याञा धुमधडाक्यात होणार असून,या याञेची संपूर्ण तयारी गावक-यांनी केली आहे.श्री क्षेत्र मांडवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी पैठण व नागतळा येथील पाण्याची कावड आणून त्याची मिरवणूक काढण्यात येते व पाडव्याच्या दिवशी सकाळी अभिषेक करून सकाळपासून दिवसभर शेरनीचा प्रसाद वाटप करण्यात येतो.तसेच या याञेनिमित्त रात्री लोककलेला प्राधान्य देत रूपाली पाटील यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मांडवा गावाचे सरपंच सुभाष माळी,माजी सरपंच देवा धुमाळ,उपसरपंच संतोष मुटकूळे,मारुती वीर,युवराज मुटकुळे,विनायक मुटकुळे,
रावसाहेब मुटकुळे,विठ्ठल मुटकुळे,नंदू श्रीखंडे,योगेश मुटकुळे,साहेबराव मुटकुळे,पञकार अशोक मुटकूळे,दिलीप मुटकुळे,राजू धुमाळ,जगन्नाथ पवार,भास्कर मुटकुळे,श्रीधर मुटकुळे,अनिल मुटकुळे, रामहरी लगड,भूषण श्रीखंडे,लक्ष्मीकांत मुटकुळे,अंगद पवार,विठ्ठल माळी,सिताराम वीर,कैलास पवार,बीबीषण श्रीखंडे,पंढरीनाथ मुटकूळे,सतिष मुटकूळे,संदिप नवले,तुळशीराम मुटकूळे,बापुराव मुटकुळे,महादेव पवार,झुंबर आबा श्रीखंडे,आदी ग्रामस्थांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.