व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक एकतर्फी होणार..!

आ.आजबे लढत देणार?

0

आष्टी-गेल्या तीस वर्षापासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक याही वर्षी एकतर्फी होणार का? आमदार सुरेश धस यांचा विजयाची घोडदौड आ.बाळासाहेब आजबे रोखणार का? अशी चर्चा सध्या सुरू असून,या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे बिगुल वाजले असून,२८ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.बीड जिल्ह्यातील कांदा मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि भुसार धान्य यादृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कडाची निवडणूक जाहीर झाली आहे.संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११,ग्रामपंचायत मतदार संघातून ४ ,व्यापारी व आडते मतदारसंघातून २ आणि हमाल मापाडी मतदारसंघातून एक याप्रमाणे १८ संचालक निवडले जाणार आहे.सेवा सहकारी सोसायटीतील ११ पैकी सात जागा सर्वसाधारण मतदारसंघासाठी,दोन जागा महिलांसाठी , एक जागा भटक्या विमुक्त जमातीसाठी आणि एक जागा इतर मागासवर्गासाठी राखीव आहे.ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार पैकी दोन जागा सर्वसाधारण,एक जागा अनुसूचित जाती जमाती आणि एक जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव आहे.या निवडणुकीसाठी २७ मार्च ते तीन एप्रिल असे उमेदवारी अर्ज भरण्याची मदत आहे. पाच एप्रिलला निवडणूक अर्जाचे छाननी होईल. ६ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील .आणि त्यानंतर २१ एप्रिलला चिन्ह वाटप करून निवडणूक प्रचारास प्रारंभ होईल.२८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर केला जाईल.सेवा सहकारी सोसायटीचे सहाय्यक निबंधक बी जे शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.गेल्या तीस वर्षापासून या बाजार समितीवर आ.धसांची एकहाती सत्ता असून,पुन्हा पुढील पाचवर्ष आपल्याच ताब्यात राहण्यासाठी आ.धस रणनिती करीत आहेत.तर आ.धसांची विजयाची घौडगौड आ.बाळासाहेब आजबे रोखणार का? आता हे माञ येणा-या दिवसांत कळेल.
माजी आ.भीमराव धोंडे यांची भूमीका महत्वाची
या निवडणूकीत माजी आमदार भीमराव धोंडे हे आमदार सुरेश धस यांना सहकार्य करणार? स्वत;चा पॅनल उभा करणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.