आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन
आष्टी-आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन मंगळवार दि.२७ रोजी सकाळी १० वा.छञपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी माजी राज्य मंत्री आ.सुरेश धस आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते अजय धोंडे,माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील तसेच सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.