“त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की…”आष्टी शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात
आमदार धस हजर नगर पंचायत पदाधिका-यांना विसर...
आष्टी-सुमधूर वाद्यांच्या गजरात अन् “जय महावीर,ञिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की” असा होणारा एकच जयघोषात सकल जैन समाजच्या उपस्थितीत आशा उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात महावीर जयंती निमित्त मंगळवार दि.४ रोजी सकाळी साडे आठ वाजता शहरातून पारंपारीक मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.
विश्वला अहिंसेचा संदेश देणा-या भगवान श्री महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी शहरात साजरा करण्यात आला.जैन श्रावक स्थानक येथे सकाळी मोठ्या उत्सावात समाजबांधव सहभागी झाले होते.जैन बांधवाने पांढरे कपडे परिधान करून सहभागी झाले होते.यावेळी मिरवणूकीत अंहिसा परो धर्म की जय..जैन धर्म की जय,जोर से बोलो जय महावीर आशा जयघोषणेने संपूर्ण शहर दुमदुमले श्रावक स्थानक,मारवड गल्ली,तेली गल्ली,कमानवेस,शनिचौक, कापड बाजार,माळी गल्ली,भाजीमंडई,रामगल्ली,साईबाबा मंदिर या मार्गी शोभायाञा काढून श्रावक स्थानक येथे समारोप करण्यात आला.या मिरवणूकीत आ.सुरेश धस स्वत; सकाळी नऊ वाजताच सहभागी होऊन जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.या मिरवणूकीत महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार धस हजर;नगर पंचायत पदाधिकारी गैरहजर
महावीर जंयती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूकीत स्वत;आमदार सुरेश धस हे हजर होऊन किमान आर्धा ते पाऊण तास या मिरवणूकीत सहभागी झाले पण या शहराचे प्रमुख प्रथम नागरीक समजले जाणारे नगर पंचायतचे नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष हे माञ गैरहजर राहिले.एरवी नगर पंचायत कार्यालय उघडण्या आगोदर नगर पंचायतच्या दारात पदाधिकारी हजर असतात मग त्यांना या मिरवणूकीत हजर राहण्याची तसदी का? घ्यावी वाटली नाही.अशी चर्चा शहरात सुरू होती.