आष्टीत भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा स्थापनादिनानिमित्त जयदत्त धस यांच्या हस्ते ध्वजारोहण
आष्टी-शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्समधील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त युवानेते जयदत्त सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आष्टी,पाटोदा शिरूर मतदारसंघातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख,बूथ समिती सदस्य तसेच उपस्थितांना व सर्व जनतेला युवा नेते जयदत्त धस यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीबदल मार्गदर्शन करून आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल सानप यांनी केले.व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी
यांच्या संभाषणाचा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लाभ घेतला.यावेळी राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच “भारत माता की जय”,भारतीय जनता पार्टीच्या जयघोषात आष्टी शहरात पेढे वाटप करून भाजपा स्थापनादिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,गणेश शिंदे,कल्याण पोकळे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक शरीफ शेख,बाळूशेठ मेहेर,आत्माराम फुंदे,संदीप खकाळ,सरपंच सुधीर पठाडे,खंडू जाधव,सरपंच अशोक मुळे,उपसरपंच जालिंदर वांढरे,नगरसेवक सुनील रेडेकर,सादिक कुरेशी,नगरसेवक सुरेश वारंगुळे,नगरसेवक अक्षय धोंडे,अड रिझवान शेख,गौतम आजबे, नगरसेवक इर्शान खान,भारत मुरकुटे,अतुल कोठुळे,दीपक निकाळजे, बन्सीभाऊ पोकळे,संजय पोकळे,अमृत पोकळे,प्रविण कदम,राधाकिसन पोकळे,जालिंदर पोकळे,सोन्या बांगर,खंडू तोडकर,पत्रकार गणेश दळवी,पत्रकार शरद रेडेकर, पत्रकार सचिन रानडे,पत्रकार प्रविण पोकळे,सरपंच शहादेव साप्ते,स्वप्निल जोगदंड,प्रविण कदम,साधू हंबर्डे,सचिन काकडे,स्वप्निल धोंडे,शुभम लोखंडे,मनोज धनवडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.