व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गँगस्टर अतिक आणि भाऊ अश्रफवर प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडून हात्या

0

वृत्तसेवा-गँगस्टर अतिक आणि भाऊ अश्रफवर प्रसारमाध्यमांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.लाइव्ह हत्याकांडाने देश हादरला आहे. शनिवारी रात्री अतिक अहमदला कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्या.या लोकांनी पोलिसांच्या गाडीवर गोळबार केला.या हल्ल्यात अतिक आणि अश्रफचा मृत्यू झाला.यूपी पोलिसांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
प्रयागराजचे पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की,तिन्ही हल्लेखोर मीडिया पर्सन म्हणून आले होते.लवलेश,सनी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत.हल्ल्यानंतर तिघांनीही आत्मसमर्पण केले. तिघांचीही पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग यांनाही गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.