व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा कामांचा धडाका;ब्रम्हगांव,टाकळसिंग गावाची केली पाहणी

आढावा दौरा व काम लवकर पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना

0

आष्टी-तालुक्यात जलजीवनमिशन कार्यक्रम अंतर्गंत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून,त्या कामांची तपासणी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव व टाकळसिंग कामांची पाहणी करत या गावात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हिजीट दौरा बीड जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केला.
आष्टी तालुक्यात झालेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांअंतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अजित पवार हे मंगळवार दि.१८ रोजी सकाळी १० वा.आढावा घेण्यासाठी आले होते.त्यांच्यासमावेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनिल कुलर्णी,वॅपकाॅस कंपनीचे हुले नाना पाटील यांच्या अधिकारी उपस्थित होते.अजित पवार यांनी तालुक्यातील ब्रम्हगांव व टाकळसिंग या गावातील जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली.त्यानंतर पवार यांनी आष्टी येथील विश्रामगृहावर येऊन आष्टी तालुका पञकार संघाशी तालुक्यातील जलजीवन मशिन कामाचा आढावाची माहिती दिली.तसेच येणा-या काळात बीड जिल्ह्यात कितीही दुष्काळ पडला तरी माझ्या भगींनीच्या डोक्यावर हंडा दिसणार आहे.त्यामुळे हि योजना पारदर्शक होऊन काम पुर्ण होण्यासाठी गावक-यांनी सहकार्य करावे असे अवाहनही त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.