व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

BREAkING NEWS-‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक

0

क्लिक2आष्टी अपडेट-खलिस्तानी समर्थक तसेच ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला शनिवारी रात्री पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.
गेल्या 36 दिवसांपासून अमृतपाल फरार होता. आपल्या एका समर्थकाच्या सुटकेसाठी अमृतपालने 23 फेब्रुवारीला पंजाबमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिस त्याचा शोध घेत होते.समर्थकांच्या गर्दीत अमृतपालला करायचे होते. सरेंडर अमृतपालला समर्थकांच्या गर्दीसह सरेंडर यायचे होते.त्यासाठी तो शनिवारी रात्री मोगाच्या रोडे गावात पोहोचला.येथे त्याच्या जवळच्या मित्रांनी पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.त्यासाठी रविवार म्हणजेच आजचा दिवस निवडला होता.सरेंडर करण्याच्या वेळी अमृतपालला आपली ताकद दाखवायची होती.जमाव जमल्याने काहीतरी वातावरण बिघडण्याची भीती पंजाब पोलिसांना वाटत होती. त्यामुळे अमृतसरचे एसएसपी सतींदर सिंह आणि पंजाब पोलिस इंटेलिजन्सचे आयजी रविवारी सकाळीच रोडे गावातील गुरुद्वारात पोहोचले.पोलीस साध्या गणवेशात आले आणि सकाळीच अमृतपालला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.