व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

निर्लज्जपणाचा कळस;कार्यालयातील सहकारीकडूनच बिल काढण्यासाठी मागीतली लाच

आष्टीतील पाटबंधारे विभागातील प्रकार

0

आष्टी-येथील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रथम लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरूड या लघुपाटबंधारे उपविभाग आष्टी या कर्मचाऱ्यांना आपल्याच अधिनस्त कर्मचाऱ्याकडून प्रवास भत्ता देयकाची रक्कम देण्यासाठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने आष्टी येथील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,आष्टी येथील लघुपाटबंधारे उपविभाग येथे कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या प्रवास भत्ता देयकाची १९४१०/ रु चा धनादेश मंजूर करण्याचा मोबदला म्हणून कुंदन अशोक गायकवाड यांनी २०००/रु.लाचेची फोनवर मागणी केली.आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरुड यांनी मंजूर झालेला धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः आणि कुंदन गायकवाड यांनी मिळून २० टक्के प्रमाणे ३८८२/रु.रुपयाची मागणी करून तडजोडी अंती ३८८०/रु.स्वीकारण्याचे मान्य केले.त्यानुसार आज दि.२४ एप्रिल २०२३रोजी आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालयामध्ये या दोन कर्मचाऱ्यांना या रकमेची लाच स्वीकारताना पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई श्री संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर, आणि श्री विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर,यांचे मार्गदर्शनाखाली बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक,श्री शंकर शिंदे यांनी पोलीस अमलदार सुरेश सांगळे,भारत गारदे, संतोष राठोड,अमोल खरसाडे,गणेश म्हेत्रे या सहकाऱ्यांसह हा सापळा यशस्वी केला.आष्टी येथील येथील हा प्रकार म्हणजे “कुंपणाने शेत खावे”अशा प्रकारचा असल्याने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस या वरिष्ठ कर्मचारी यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्याशी केलेला आहे.अशी चर्चा आष्टीतील जनतेमध्ये सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.