व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेत जमिन विकू देत नाही म्हणून पोराने बापाला मारत जिवे मारण्याची दिली धमकी;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

तालुक्यातील मंगरूळ येथील घटना

0

क्लिक2आष्टी अपडेट-दारूच्या नशेत मला जमिन विकायची आहे अन् तुम्ही विकू देत नाही म्हणत मुलाने बापाला लोखंडी पाईपने नडग्या हाणत पाठीवरही मारले असून,जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे.वडिलांच्या फिर्यादीवरून मुलावर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी शहरा पासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या मंगरूळ येथील आबा नाथु दिंडे (वय ६९) यांना त्यांचा मुलगा विशाल आबा दिंडे याने दारूच्या नशेत राञी १० ते ११ च्या दरम्यान मला शेत जमिन विकायची आहे असे म्हणत वडिल आबा दिंडे यांना लोखंडी पाईपने पायाच्या नडगीवर पाठीवर मारत दुखापत करत शिवीगाळ केली.व जिवे मारण्याची धमकी दिली.म्हणून आष्टी पोलिसांत आबा नाथु दिंडे यांच्या फिर्यादीवरून विशाल नाथु दिंडे यावर आष्टी पोलिसांत गुरनं १९१/२०२३ कलम ३२३,३२४,५०४,५०६ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काॅ.क्षिरसागर हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.