DYSP च्या नाकावर टिच्चून;तालुक्यात बनावट दारूचा महापूर
उपविभागीय अधिक्षक अभिजीत धाराशीवकर यांना नाही काहि घेणे-देणे
क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचे रॅकेट सक्रीय असून,यावर कारवाई करण्यापेक्षा ह्या बनावट दारूवाल्यांकडून ठराविक हाप्ता घेऊन हि बनावट दारू करण्यास पोलिस विभाग प्रोत्साहित करत आहे.त्यामुळे DYSP च्या नाकावर टिच्चून आष्टीत बनावट दारू तयार होत आहे.अशी चर्चा तालुक्यात दिसून येत आहे.

सध्या बनावट दारूचे अड्डे खेड्या-पाड्यात असून,या अड्ड्यांची माहिती सर्व पोलिस विभागाला माहिती आहे.परंतु जाणून-बुजून अर्थपुर्ण दुर्लेक्ष करत आहेत.जर सर्वसामान्य व्यक्तींना दारू कुठे तयार होती हे माहित असते पण पोलिसांना यांची खबर कशी होत नाही.त्यामुळे उपविभागीय अधिक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी सपशेल दुर्लेक्ष केल्याने हे धंदे बोकाळले आहेत.
धाराशिवकर यांनी पदभार घेतल्यापासून एकही मोठी कारवाई नाही
आष्टी येथील तत्कालीन उपिअधिक्षक विजय लगारे यांची खोपोली येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अभिजीत धाराशिवकर यांनी पदभार स्विकारला पण पदभार स्वीकारल्यापासून अध्यापपर्यंत एकही मोठी कारवाई केली नाही हे माञ विशेष
चहापेक्षा किटली गरम
DYSP कार्यालयाचे कर्मचारी म्हणजे DYSP साहेबांपेक्षा कडक फक्त राहणीमानात एक पोलिस कर्मचारी तर गेल्या अनेक वर्षापासून आष्टी येथील रहिवासी असलेलेच पोलिस कर्मचारी ठाण मांडून आहेत.विशेष म्हणजे हा पोलिस कर्मचारी कधीच गणवेशात नसतो व सर्व हाॅटेल,वाळूवाले,यांच्याकडून ठराविक तारखेला हाप्ते घेऊन जगत आहेत.पण एखाद्या हाॅटेलवाल्याने हाप्ता वेळेवर दिला नाहि तर आबोबो विचारूच नका म्हजेच मराठी म्हनीप्रमाणे चहा पेक्षा किटली गरम असल्याचे दिसून येत आहे.