व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

माजी बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पती विजय गोल्हार सह ३२ जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

बालविवाह प्रसंगी उपस्थिती आली अंगलट

0

क्लिक2आष्टी अपडेट-प्रशासकीय अधिका-यांच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील वेताळवाडी येथील १४वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.या प्रकरणी माजी बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांचे पती विजय गोल्हार,मुलीच्या व मुलाच्या माता-पित्यासह भटजी,आचारी,वाजंत्री,फोटोग्राफर,मंडपवाल्यासह ३२ जणांविरोधात आष्टी पोलिसांत शनिवारी दि.३गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून अधिक मिळालेली माहिती अशी आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील एका (१४) वर्षीय मुलीचा विवाह शुक्रवारी दि.२होत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी यांना प्राप्त झाली होती. यानंतर अधिका-यांनी घटनास्थळी जावून हा विवाह रोखला. या प्रकरणी ग्रामसेवक शंकर मुरलीधर मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरून भास्कर आश्रुबा पालवे(मुलीचे वडील),सिंधूबाई भास्कर पालवे(मुलीची आई), आसरू रघू पालवे(मुलीचे आजोबा),केसराबाई आसरू पालवे(मुलीची आजी),शिवाजी आश्रुबा पालवे(चुलते),संगिता शिवाजी पालवे (चुलती),चंद्रकांत राघू पालवे(चुलते),साखरबाई चंद्रकांत पालवे, भीमराव पालवे, चतुराबाई भिमराव पालवे, विठ्ठल पालवे,परमेश्वर पालवे,युवराज पालवे,सुभाष पालवे, एकनाथ पालवे,शंकर पालवे,लहू पालवे, शोक वनवे, रामराव मारुती वनवे,विजयकुमार कारभारी गोल्हार,राहुल सुभाष काकडे,संदीप गर्जे (नवरदेव,रा.सुरुडी, ता.आष्टी),अर्जुन बाबू गर्जे (नवरदेवाचे वडील,रा.वेताळवाडी),पवार (फोटोग्राफर) यांच्यासह अन्य ३२ जणांविरोधात शनिवारी रात्री आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजसेवकच करतात बालविवाहास प्रवृत्त
स्वत;ला समाजसेवक म्हणून मिरवणा-या समाजसेवकांनी बालविवाह रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज असतांना तेच लवकर लग्न लावून लवकर मोकळं व्हायचं आशा पध्दतीने वधू-वरांच्या आई वडिलांना सांगून वेळ प्रसंगी अर्थिक मदत करून बाल विवाह लावण्यास मुला-मुलींच्या आई वडिलांना प्रवृत्त करतात त्यामुळे आता बाल विवाह रोखण्यासाठी राजकारणी,समाजसेवकांपेक्षा प्रशासानानेच पुढे येण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.