व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

इंस्टाग्रामवर औरंगजेबचा फोटो टाकून “बाप तो बाप रहेगा”मजकूर टाकल्याने आष्टीत तणाव;एकावर गुन्हा दाखल

आष्टी शहर कडकडीत बंद ठेवून निषेध करावा हिंदू संघटनेचे अवाहन

0

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी शहरातील आझादनगर येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेऊन “बाप तो बाप रहेगा” असा मजकूर टाकल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.सर्व हिंदू संघटना एकञ येत सदरील तरूणावर आष्टी पोलिसांत राञी उशीरा गुन्हा दाखल करत हिंदू संघटनेच्या वतीने आज आष्टी बंदचे अवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,फिर्यादी शुभम शहाराम लोखंडे वय-२३ वर्षे,रा.माळी गल्ली आष्टी यांच्या फिर्यादीवरून दि.८ रोजी दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास मी बस स्टॅण्ड आष्टी येथे असतांना माझा आयफोन मोबाईल मध्ये इंन्स्टाग्राम नावाचे सोशल मिडीया अॅपलीकेशन पाहत असतांना मला आष्टी येथील रहीवाशी व माझ्या परीचयाचा जैद अय्युब सय्यद यांचे इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्याच्या अकाऊंटवर लबेका ग्रुप आष्टी या पेज वर औरंगजेब यांचा फोटो व त्या फोटोला “बाप तो बाप रहेगा” असे वाक्य टाकलेले दिसुन आले औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा शत्रु असल्याचा ईतिहास असुन छञपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे दैवत मानले जातात.परंतु तरी देखली इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर औरंगजेबाचे फोटो टाकुन व त्यावर “बाप तो बाप रहेगा” अशा आशयाचे वाक्य टाकुन धार्मीक भावना दुखवल्या असुन दोन समजामध्ये तेड निर्माण होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यद च्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९५(A),५०५(१)(ब)नुसार आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत.


आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यासाठी कुणी प्रवृत्त केले?
पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले की, औरंगजेबाचे आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये एक जण आरोपी असून या प्रकरणात अजून कुणी आरोपी आहेत का? या मुलाला हे स्टेट्स ठेवण्यासाठी कुणी प्रवृत्त केले होते का?, याचा शोध घेतला जाईल.सध्या आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतले असून त्याचा तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगीतले.
नागरीकांनी शांतता राखावी-नायब तहसिलदार
कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरीकांनी,तरूणांनी गैर प्रकार घडवून आष्टीत तेड निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये,जर कुणाला काहि कृत्य आढळून आले तर पोलिस प्रशासन,महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असे अवाहन नायब तहसिलदार राजाभाऊ पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.