व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी पोलिसांची नामी शक्कल;शहराची सुरक्षा व्यापा-यांच्या भरवशावर..!

0

क्लिक2आष्टी अपडेट-सध्या लुट-घरफोडी,चोरी यासह आदि चोरींचे प्रमाण वाढले असून,पोलिस तर आपल्या परिने काम करत आहेत.पण सध्या पोलिस दलामध्ये ५०% कर्मचारी असल्याने कर्मचा-यांवर ताण येत आहे.त्यामुळे शहरातील व्यापा-यांनी आपल्या दुकानात लावलेल्या कॅमे-यातून एक कॅमेरा शहरासाठी रस्तावर लावावा अशी शक्कल पोलिसांनी लढवत शहराची सुरक्षा व्यापा-यांच्या भरवशावर सोडत असल्याचे दिसून येत आहे.

आष्टी पोलिस ठाण्याच्यावतीने बुधवार दि.१४ रोजी सांयकाळी ६ वा.पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने व्यापा-यांची बैठक बोलावली होती.या बैठकीस पोलिस उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर,पोलिस निरीक्षक हेमंत कदम,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी व्यापा-यांच्या अडी-अडचणी जाऊन घेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.शहराच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने शहरातील मुख्य बाजारपेठेत सार्वजनिक कॅमेरे बसविणे,तसेच आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार हे भुरटे चोर करत असून,ते मोबाईल चोरून आपल्यातीलच मोबाईल दुकानदारांना विकूण त्या मोबाईलचे स्पीयरपार्ट काढून विकले जात असल्याचे एपीआय देशमुख यांनी सांगीतले.यावेळी पोलिस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर,हेमंत कदम यांनी वापा-यांना सुचना व मार्गदर्शक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.