व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

स्मशानभूमी गायरान जमीनत अतिक्रमण आरणविहराचे सरपंच अपात्र-रेकॉर्ड फेरफार उघड;जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अरणविहिरा/तागडखेल ग्रामपंचायतीतील प्रकार;तक्रारीनंतर चौकशीत अनियमितता सिद्ध

0

click2ashti-आष्टी तालुक्यातील अरणविहिरा/तागडखेल ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा आण्णासाहेब सिरसाट स्मशानभूमीच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अपात्र ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांच्या पतीने संबंधित जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप असून, त्याबाबत उद्धव कारभारी शिरसाट यांनी अॅड. उद्धव रासकर यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीवर सुनावणी घेण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. चौकशीदरम्यान सरपंचांनी ग्रामपंचायतीचे अधिकृत रेकॉर्ड बदलून अतिक्रमित जागा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर दाखविल्याचे उघड झाले.
दरम्यान, ग्रामसेवकाने सादर केलेला अहवाल, उपविभागीय अधिकारी पाटोदा यांचा अहवाल तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात संबंधित सर्वे नंबर ६५ मध्येच बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.या निर्णयामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे गायरान व सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.