बीड जिल्ह्यात एनसीएमसी कार्डः २ लाख ९० हजार ९३२ जणांची नोंदणी
प्रवासात १ ऑगस्टपासून बंधनकारक, आतापर्यत १ लाख ६८ हजार कार्डचे वितरण विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांची माहिती
गणेश दळवी | आष्टी-राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमएसी (नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड) बंधनकारक करण्यात येणार आहे. दरम्यान,बीड जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून या कार्डसाठी प्रवाशांची नोंदणी सुरू आहे. या कालावधीत आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ९३२ जणांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख ६८ हजार ६५४ जणांना कार्ड अॅक्टिव्ह झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी दिली.
एस.टी.च्या प्रवासी सवलतींचा लाभघेण्यासाठी प्रवाशांनी १ ऑगस्टपूर्वी कार्ड काढणे आवश्यक बनले असून,एस.टी. महामंडळाच्या सवलती घेईच्या असतील तर कार्ड काढून घ्यावे असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने (एस.टी.) १८ फेब्रुवारी पासून “स्पे ऑन द गो,एनसीएमसी इनेबल्ड कार्ड योजना कार्यान्वित पर्यान्वित केली आहे.या है.या पार्श्वभूमिवर बीड विभागांतर्गत येणाऱ्या बीड,अंबाजोगाई,धारुर,परळी, माजलगाव,गेवराई,पाटोदा,आष्टी,या आगारांसह १९ विविध बसस्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्षासह विविध ठिकाणी २०५ प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली माध्यमातून या कार्डसाठी नोंदणी केली आहे.या नियुक्त प्रतिनिधींच्या आहे. दरम्यान, नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस.टी.च्या प्रवासी सवलतींचा लाभमिळविण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार असल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान,बीड जिल्ह्यात नियुक्त २२४ प्रतिनिधींच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ९३२ जणांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे. यापैकी १ लाख ६८ हजार ६५४ प्रवाशांना मिळालेले कार्ड अॅक्टिव्ह झाले आहे. एनसीमएसी कार्डची नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांमध्ये हे कार्ड नोंदणी केलेल्या केंद्रामध्ये मिळणार आहे.त्यामुळे प्रवासी सवलतींचा लाभ घेणाऱ्या एस.टी. प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता या प्रवाशांना कार्ड काढून घेणे आवश्यक ठरणार आहे.
प्रवासी सवलतीसाठी कार्ड आवश्यक
इबिक्स कॅश या कंपनीच्यावतीने एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली जात आहे.याशिवाय कार्डच्या नोंदणीसाठी आगार,बसस्थानकाबरोबरच एनएसडीएल पेमेंट बँकेद्वारे नियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या असलेल्या या कॉर्डवर प्रवाशी व्यक्तीचे आधारकार्ड नुसार नाव, फोटो आणि माहिती असणार आहे ज्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये पारदर्शकता येणार आहे. एस.टी.च्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड काढणे आवश्यक असून,लवकरात लवकर कार्ड काढून घ्यावे लागणार आहे.
प्रत्येक प्रवाशांने प्रवासी सुविधेसाठी कार्ड काढावे
एस.टी. बसच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी हे कार्ड आवश्यक आहे.दि.१ ऑगस्टपासून या कार्ड शिवाय सवलती मिळणार नाहीत.तरी प्रवासी सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने कार्ड काढून घ्यावे.
–अनुजा दुसाने,विभाग नियंत्रक बीड