व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; शासकीय मेडिकल कॉलेजसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू-अमृता फडणवी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत; आ. सुरेश धस यांची मेडिकल कॉलेजची मागणी

0

click2ashti-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी विधानसभा मतदारसंघात आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.यावेळी आष्टी मतदारसंघासाठी शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या,“मी आज प्रथमच बीड जिल्ह्यात आले असून रुग्णसेवेच्या निमित्ताने येथे येण्याचा योग आल्याचे भाग्य वाटते. निरोगी समाज हीच देशाची खरी ताकद असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.” आ. सुरेश धस यांनी केलेली शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी रास्त असून ती मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

शिबीरात बोलतांना आ.धस दिसत आहेत.

आ. सुरेश धस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून लाखो गरजू रुग्णांना दिलासा दिला आहे.आष्टी मतदारसंघ हा ऊसतोड मजुरांचा भाग असल्याने येथे आरोग्य सुविधांची मोठी गरज आहे. त्यामुळे मतदारसंघाला शासकीय मेडिकल कॉलेजची मान्यता देऊन गोरगरीब रुग्णांची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली.पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आरोग्याबाबत जनजागृती करत निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. मुलांना लहान वयात मोबाईलपासून दूर ठेवावे आणि मोबाईलचा मर्यादित वापर करावा,असा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख डॉ.रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आरोग्यसेवा गोरगरीबांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. आष्टी येथे राज्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिरांपैकी एक शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी आ.सुरेश धस यांचे कौतुक केले.
यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,डॉ.एकनाथ पवार,डॉ. मधुसूदन गायकवाड,प्राजक्ता धस,ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री, दत्ताभाऊ काकडे,अप्पर जिल्हाधिकारी हारिष धार्मिक,नगराध्यक्षा आयशा इनातुल्ला बेग,दिपाली जाधव,प्रतिभा गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले,तर आभार आ. सुरेश धस यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.