व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीचा जावई मुंबईचा फौजदार; तुषार तरटे यांचा नागरी सत्कार,यशाचे सर्वत्र कौतुक

नोकरी सांभाळत मिळवलेले यश प्रेरणादायी-माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे

0

click2ashti-नोकरी करत असताना पोलिस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन उल्लेखनीय यश संपादन करणारे तुषार तरटे यांची मुंबई पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) पदावर निवड झाल्याने आष्टी तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आष्टीचा जावई मुंबईचा फौजदार झाला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी केले.
येथील शहादेव धोंडे यांचे जावई तुषार तरटे यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल मंगळवार (दि.५) रोजी सायंकाळी ७ वाजता माळीवाडा येथे नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी रंगनाथ धोंडे बोलत होते.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे, नगरसेवक भारत मुरकुटे,राजू निकाळजे,अक्षय धोंडे,बबन कदम, संदीप धोंडे,सुरज रोकडे,विजय धोंडे, पत्रकार सचिन रानडे, गणेश दळवी,उमेश धोंडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना रंगनाथ धोंडे म्हणाले की,“नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षा देऊन मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे.तुषार तरटे यांनी आपल्या सेवाकाळात गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे,”अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.तुषार तरटे यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळत असून,स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा सकारात्मक संदेशही या निमित्ताने समाजात पोहोचत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.